|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

हजारो वर्षांपूर्वी वैश्विक शक्तीमधील स्पंदने, ते वातावरण, ते चक्र ज्या भूमीवर पडलं ती भूमी प्रभावी झाली आणि .... ते material विभूती म्हणून वापरलं गेलं.

ही वैश्विक चितशक्ती आपल्यापर्यंत आणणारे दृष्यरुपातील एक प्रभावी माध्यम म्हणजे विभुती. म्हणूनच विभुती लावल्यानंतर संपूर्ण आंतर्देहामध्ये एक प्रकारचे वेगळे वातावरण तयार होते, अस्थिरता नष्ट होते व आपण जे आहोत, त्याच्या मागे एक प्रेरक शक्ती आहे व तिथे आत्म्याचे दर्शन आहे याची जाणीव होण्यास व ज्ञान होण्यास सुरुवात होते त्याचप्रमाणे, आपल्या आजुबाजुच्या वातावरणातील अशुभ शक्तींचा विनाश करून शुभ शक्तींना वाढवण्याचे सामर्थ्य या विभुतीमध्ये आहे.

<< Previous      Next >>