|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

अनेक जन्मांच्या तपस्येनंतर सद्गुरु लाभत असतात
म्हणुनच त्या सद्गुरुंशी सतत,
नामस्मरणाच्या माध्यमातून का होईना,
अनुसंधान असणे अतिशय महत्वाचे आहे.
'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असे मग….
गुरूच त्या भक्ताला म्हणायला लागतो.
आणि….
त्यानंतर गुरु त्याची वाटचाल योग्य अशा
मार्गावरून करायला सुरुवात करतात.
हे तत्वज्ञान एकदा कळलं की मग
जगाच्या पाठीवर कुठेही जा,
तुम्हाला जीवनामध्ये दुःखावर निश्चितप्रकारे
मात करता येणारच.
या सततच्या अनुसंधानामुळे गुरुंनी
तुम्हाला जे दिलेले आहे ते द्विगुणित व्हायला
लागते. समाधानाचा, आनंदाचा व गुरुतत्वाचा
गुणाकार होऊ लागतो.
आणि होता होता,
तुमच्याबरोबर सारा समाज,
सारे राष्ट्र व सारे विश्व्
सुखी, समाधानी होऊ शकते.

….आनंदयोगेश्वर सद्गुरू भाऊ महाराज

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>