|
श्री. दिपक साखळकर
एकदा श्री. पाध्ये यांनी सांगितल्याप्रमाणे मी शनिवारी दुपारी स्थानावर पोचलो . त्यावेळी सदगुरू भाऊमहाराज श्रीटेंवेस्वामी महाराजांना नैवेद्य दाखवत होते. त्यावेळी त्यांनी एका भक्ताला हाक मारून अनुसंधान ठेव असे सांगितले. त्यांचे ते शब्द माझ्या कानात इतके भिनले की मी स्थानावरून हलूच शकलो नाही व संध्याकाळची आरती व प्रवचन करूनच जाण्याचे ठरवले. आश्चर्य म्हणजे - सदगुरू भाऊमहाराजांच्या प्रवचनांमधूनच माझ्या मनामध्ये अनेक दिवस असलेल्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळाली. आणि चालते बोलते देहरूपातील सत्पुरूष आजही आहेत याची मला खात्री पटली.
त्यानंतर लगेचच्याच गुरूवारी मनुष्यस्वभावानुसार मी माझ्या व्यथा सांगण्यासाठी त्यांची खोपोली याठिकाणी भेट घेतल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितले की “भूतकाळ विसरून जा, भविष्याचा विचार करताना वर्तमानामध्ये जग. सुधारण्याची संधी आली आहे ती सोडू नको. इथे अनुसंधान ठेवा." त्यानंतर मी त्यांना काय उद्योग करावा याविषयी विचारले. तेव्हा माझ्या बरोवर श्री. पाध्येंनीच त्यांची रिक्शा चालवण्याविषयी विचारले.
सद्गुरू भाऊमहाराजांनी सांगितले "तुला येत असेल तर चालवायला हरकत नाही”. आणि त्यांच्या त्या भेटीतील अनुभव पाठीशी असल्यामुळे माझ्याजवळ रिक्शा चालवण्याचा परवाना नसतानासुध्दा मी रिक्शा चालवू लागलो. अनेक महिने हे माझे उदरनिर्वाहाचे साधन झाले होते. आणि अचानक एक दिवस खोपोलीला नमस्कार करताना सदगुरू भाऊ म्हणाले “उद्यापासून रिक्शा चालवणे बंद पुढे काय करायचे ते नंतर पाहू.
मला फार बरे वाटले कारण वयोमानामुळे मला रिक्शा चालवण्याचा कंटाळा आला होता पण थोडे वाईटही वाटले. आता पुढे काय? पण सदगुरू सांगतात ते योग्यच असते याची प्रचिती मला आली. मला कळले की जी गाडी मी चालवत होतो त्या गाडीचे पेपर्सच नव्हते आणि ज्या व्यक्तीची मी गाडी घेतली होती त्याचीही हत्या झाली होती.
पुढे काय व्यवसाय करावा या विवंचनेत असतानाच गोव्याला जाण्याचे ठरले. तेव्हा काही कारणास्तव गाडीला उशीर झाल्यामुळे आम्ही 'माणगांवला जाऊ म्हणून रत्नागिरी या ठिकाणी उतरलो. दर्शन वगैरे घेऊन गोव्याला जाऊन पुन्हा मुबईला आल्यावर स्थानावर पोचलो. तेव्हा काही गुरू बंधू भगिनींनी मला विचारले की "आम्हाला माणगांवला जाण्याची इच्छा आहे तर तुम्ही न्याल का" थोडा विचार करून सद्गुरू भाऊमहाराजांना याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी यात्रेचा व्यवसाय सुरू करण्याविषयी आशीर्वाद दिले आणि त्यादिवसापासून गुरुसेवेची जाणीव म्हणून प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची स्थाने तसेच अध्यात्मिक तीर्थक्षेत्री यात्रा काढण्याचा संकल्प केला. यात्रा काढण्यापूर्वी सदगुरू भाऊमहाराजांना विचारून त्यांची परवानगी घेतल्याशिवाय मी जात नसे. या श्रध्देचे फळ मला अनेक वेळा मिळाले. उदा. गोध्रा येथे दंगल होण्याआधी गरुडेश्वर गिरनारला जाण्याची आमची यात्रा सदगुरू भाऊंच्या सांगण्यावरून आम्ही रद्द केली. तसेच पावसाळ्यातील माणगांवसह ठरलेली कोकण यात्रा सदगुरूंच्याच सांगण्यावरून रद्द केली त्याचे कारण आम्हाला नंतर कळले त्याच - दरम्यान कोकण रेल्वेला मोठा अपघात झाला होता.
अशाप्रकारे अनेक यात्रांमध्ये त्यांनी आम्हाला अनुभूति देऊन आमच्यावर येणारी संकटे दूर केली. तर काही वेळेला चांगल्या प्रचितीही दिल्या. परमपूज्य भाऊ आम्ही निघताना नेहमी सांगायचे की “माझे आशीर्वाद तुमच्याबरोवर आहेत. जेथे जेथे तुम्ही जाल तेथे आम्ही तुमच्याबरोबर आहोतच. " माझी अमरनाथ यात्रा मात्र राहून गेली होती. दरम्यानच्या काळात सद्गुरूंनी देहं ठेवल्यामुळे आम्ही निराश झालो होतो. गुरूवर्य भाऊमहाराजांच्या देहावसनानंतर बरेच दिवस कुठलीच यात्रा झाली नव्हती परंतु रविवार दिनांक ५ जून २००५ या दिवशी मी अचानक श्री. चोरगे यांच्याबरोबर सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज यांच्या पादुका स्थानावर, जे खामकरांच्या घरी आहे, मी पोचलो. हा दिवस माझ्या दृष्टीने फार मोठा होता . पादुका स्थानावर प्रवेश केल्यावर सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या त्या ठिकाणी पुजेमध्ये असलेल्या फोटोतील त्या तेजाने मी त्याठिकाणी आकर्षिला गेलो. सदगुरू भाऊमहाराजांचे ते हास्य जणुकाही मला सांगत होते “काय शेवटी आणलं ना तुला" मी नमस्कार करण्यासाठी डोके टेकवले अणि माझ्या कानावर शब्द आले “हे माझे घर. काय उरलं सुरलं आहे ते इथे पूर्ण करून घे. आम्ही इथे आहोत . "
मला जे काही वाटले ते सांगण्याइतपत माझी खामकरांशी ओळख नव्हती म्हणून मी ते माझ्यापुरतेच ठेवले आणि घरी आलो. परमपूज्य भाऊमहाराजांच्या “आम्ही आहोत या वाक्याचा उलगडा मला होईना. ब-याच दिवसानंतर श्रीशंकर महाराजांच्या माध्यमातून झाला. दरम्यानच्या काळात मी सद्गुरू भाऊच्या या पादुका स्थानावर जातच होती होतो. एकदा अचानक सकाळच्या वेळी सदगुरु भाऊंचे शब्द कानी पडले “तुझ्याकडे जो श्रीशंकरमहाराजांचा फोटो आहे तो आजच्या आज खामकरांच्या घरी पोचता कर." त्याप्रमाणे मी तो देण्यास गेलो असता खामकरांकडून त्यांनाही "श्रीशंकरमहाराज आज तुमच्याकडे स्वतः येणार? असा दृष्टांत सद्गुरू भाऊंनी दिला होता. सदगुरूंची ही लीला अगाध आहे.
अशी प्रचिती आल्यानंतर माझे तिथे जाणे खंडित न होता चालू राहिले. आणि काही दिवसातच माझ्या मनामध्ये गेले अनेक दिवस असलेल्या यात्रेचा योग आला तोही नामस्मरणाच्या यात्रेचा. या सर्व यात्रांमध्ये आलेले रोमांचकारी अनुभव या पुस्तकामध्ये विस्तृतपणे दिलेले आहेतच. या ठिकाणी विशेष नमूद करण्याची गोष्ट म्हणजे “संकल्प जर शुध्द असेल तर तो पूर्ण करण्यासाठी सद्गुरू नेहमी त्या अनुषंगाने आश्चर्य वाटाव्या अशा घटना घडवत असतात.' त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी या यात्रांमध्ये घेतला. नामस्मणाच्या यात्रेचा
श्री. खामकरांच्या घरी असलेल्या पादुका स्थानावरील माझे येणे हा माझ्यासाठी, माझ्या सारख्या अनेक भक्तांच्या मनातील सदगुरूंच्या प्रसार आणि प्रचाराप्रति असलेल्या आंतरिक इच्छेची परिपूर्ती करण्याचा योगच जणू. श्री. व सौ. खामकर हे सदगुरू भाऊमहाराजांचे अनुग्रहित दांपत्य इतर भक्तांच्या सहकार्याने सदगुरू भाऊमहाराजांचे अध्यात्मिक कार्य करत आहेत ते प्रत्यक्ष अनुभवल्यानंतरच जाणवते . म्हणुनच सदगुरूंच्या या पवित्र कार्यामध्ये माझ्याकडूनही अशीच सेवा कायम घडावी ही सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांकडे कळकळीची प्रार्थना.
|