श्री. सुजित वि. सावंत
माझ्या दृष्टीने १९९० साल हे माझ्या जीवनाला सर्वार्थाने कलटणी देणारे ठरले. कारण याच काळात माझा आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांशी परिचय झाला, त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला व त्यांच्या माध्यमातून प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचीही ओळख झाली. एका अस्थिर, भरकटलेल्या मनाला खंबीर व अचल अशा अध्यात्मिक विचारांची साथ मिळाली. सद्गुरुंच्या कृपेची जोड मिळाली.
'एक दत्तमंदिर आहे, तेथे दर गुरुवार व शनिवार आरती होते व तेथे सद्गुरु भाऊ नामक सत्पुरुष आहेत. ते प्रवचन देतात.' या पलीकडे मला काहीच माहित नव्हते. पहिल्या गुरुवारी असाच वडिलांबरोबर स्थानावर गेलो व या स्थानाशी, या सद्गुरुंशी आपले काहीतरी जुने नाते आहे असे वाटून गेले. मनातून या सत्पुरुषाप्रती असलेले आकर्षण दर गुरुवार, शनिवार गणिक वाढत होते. काहीही न मागता स्वामी महाराज व भाऊ महाराज माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करत होते व स्वामी महाराजांच्या देहातीत रुपातला दाखला गुरुवर्य भाऊंच्या सगुण रूपातून महाराज क्षणाक्षणाला दाखवून देत होते.
माझ्या जीवनात मला माझ्या सद्गुरूंची प्रचिती पावलोपावली मिळाली आहे. त्यातील एका अनुभवामुळे तर माझ्या पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली व आपल्या मनातील समस्या, मनातील भक्ती काहीही न बोलता सद्गुरुंपर्यंत पोचते हा माझा विश्वास आणखी दृढ झाला.
एस.एस.सी. परीक्षा पास झाल्यानंतर इतर मित्रांप्रमाणे माझीही इंजिनियरिंग शाखेमध्ये प्रवेश घेण्याची प्रबळ इच्छा होती. ती पूर्ण झाली नाही. अखेर वर्ष फुकट जाऊ नये म्हणून नाईलाजास्तव वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतला. परंतु पुन्हा कुठल्यातरी दुसऱ्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी माझे प्रयत्न चालू होते. स्थानावर येणे तर चालूच होते पण भाऊंमहाराजांना याविषयी काही बोललो नव्हतो. ते मात्र माझ्या मनाची घालमेल नक्कीच जाणून असतील कारण दुसऱ्याच वर्षी मला सास्मिरा कॉलेजचा पत्ता मिळाला व आढळून आले की इथे टेक्सटाईल इंजिनीरिंग संबंधात डिप्लोमा घेतले जातात.
मी ऍडमिशनसाठी फॉर्म भरला. परंतु माझे प्रारब्धच इतके कडक असावे की या कॉलेजमध्ये माझे अगदी शेवटच्या वेटिंग लिस्टमध्येही नाव लागले नाही. मनाने खट्टू झालेलो मी मात्र यापुढे कधीही इंजिनियरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन न घेण्याचे ठरवले. स्थानावर येणे, गुरुभाऊंचे नियमित दर्शन घेणे तर चालूच होते. परंतु प्रत्यक्षात मात्र भाऊंशी हे सर्व बोलण्याचे धाडस नव्हते व कुठेतरी हा विश्वास होता की 'भाऊमहाराज ही साक्षात माझी गुरुमाऊली आहे. माझ्या मनातील सर्व गोष्टी मी न सांगताही तिला कळणारच.
आणि अचानक तो साक्षात्कारी अनुभवाचा दिवस उजाडला. महत् योगायोग म्हणजे त्या दिवशी भाऊमहाराजांचा वाढदिवसही होता. आमच्या इंजिनियरिंग लाईनमध्ये Production, Planning and Control ह्या तीन गोष्टींना अनन्यसाधारण महत्व दिले जाते. पण यावेळी स्वामी महाराजांनी आणि आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांनी अगोदरच आखून ठेवलेले Planning व त्यावरी Contr हे एखाद्या उच्च विद्याविभूषित व उच्च पदस्थ इंजिनीयरलाही नतमस्तक व्हायला लावणारे होते. जीवनातील सर्व उच्च पदव्या व मानसन्मान या त्यांच्या चरणांपर्यंत येऊन संपतात व तेथून पुढे आमच्या महाराजांचं विराट रूप साकार होतं. ७ सप्टेंबरला स्थानावरून मी सकाळी नामस्मरण करून घरी पोचतो तर काय पाहतो - कॉलेजचा एक माणूस आमच्या घरावर दत्त म्हणून हजर होता. त्याच्या हातात ऍडमिशनचा फॉर्म होता. त्यांनी सांगितले की "तुमचे ऍडमिशन आमच्या कॉलेजमध्ये झाले आहे. तुम्ही उद्या कॉलेजमध्ये येऊन फी भरू शकता."
अगदी हातातून निसटून गेलेला तो आनंदाचा क्षण माझ्या भाऊ महाराजांनीच मला पुन्हा मिळवून दिला होता. कोणत्याही कॉलेजची माणसे ही अगदी एक महिना उलटून गेल्यानंतर घरी येऊन ऍडमिशनचा दाखला देतात हे पूर्वी कधीही ऐकिवात नव्हते.. माझ्या बाबतीत कॉलेजवाल्यांना महाराजांनी अगदी चालत माझ्या घरापर्यंत आणले व माझ्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकली.
अशाप्रकारे एकदा सद्गुरु भाऊंच्याच केवळ कृपेमुळे मी एका फार मोठ्या संकटातून तारला गेलो. कॉलेज पूर्ण झाल्यावर लगेचच मला नोकरी मिळाली व अगदी अल्पावधीतच म्हणजे अगदी वयाच्या २४ व्या वर्षीच मी Assistant Dyeing Master च्या पदावर पोचलो. याचे सर्व श्रेय माझे परात्पर गुरु टेंबे स्वामी महाराज व त्यांची स्पंदने आमच्यापर्यंत खेचून आणणारे माझे सगुण रूपातील गुरु आनंदयोगेश्वर भाऊमहाराज यांचेच.
मात्र या आनंदाच्या दिवसांवर पुन्हा एकदा माझे प्रारब्ध आडवे आले. मी काम करीत असलेल्या कंपनीमध्ये सेंट्रल एक्साईसची (Central Excise) धाड पडली. माझ्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मी त्या काळात आठ दिवसांच्या रजेवर होतो. या धाडीमध्ये टेक्निकल स्टाफने मेन्टेन केलेली डायरीच हाती सापडली व त्यात माझेच अक्षर जास्त प्रमाणात होते. त्यामुळे प्रमुख साक्षीदार म्हणून एक्साईसवाल्यांचा माझ्यासाठी शोध सुरु झाला. त्यातच कंपनीच्या मालकाला एक्साईस न भरल्यामुळे अटक करण्यात आली. मालकाच्या जवळच्या माणसांनी मला घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सांगितले. मी मनाने अतिशय अस्वस्थ झालो. घरातील सर्वांचेच मानसिक संतुलन बिघडले. पुढे होऊ शकणाऱ्या प्रकाराच्या कल्पनेनेच मन हादरून गेले. त्यातच मी घर सोडले व काकांकडे रहायला गेलो.
शुक्रवारी मालकाला अटक केल्यानंतर शनिवारी सेंट्रल एक्साईसची माणसे माझ्या घरी search warrant घेऊन आली व माझ्या घरच्यांना मला मंगळवारपर्यंत एक्साईस ऑफिसमध्ये स्टेटमेंटसाठी हजर होण्यास सांगितले. अन्यथा याचे परिणाम वाईट होतील अशी तंबीसुद्धा दिली. याउलट मालकाच्या माणसांचे सारखे फोन येत होते की, "तू जर खरे स्टेटमेंट दिलेस तर तुलाच एक्साईजवाले अटक करतील. तेव्हा तुझे भले यातच आहे की जोपर्यंत मालकाला जामीन मिळत नाही तोपर्यंत तू एक्साईजवाल्यांपासून
दूरच रहा." या कचाट्यात मी पूर्णपणे सापडलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे वडील सद्गुरु भाऊ महाराजांच्या घरी गेले.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|