भाऊ नेहमी म्हणायचे की "Shri Guru Charitra Grantha is Encyclopedia of entire human life and though it is
written some 500 years ago, the contents therein are applicable in every period of time.” ह्याची प्रचिती मला नेहमी मिळाली. सद्गुरु आपल्याला अशा अनेक साक्षात्कारी प्रचिती देतच असतात. त्याची अनुभूती घेण्यासाठी आपणच मनाने व बुद्धीने सिद्ध असायला हवे.
एका गुरुपौर्णिमेला नमस्काराच्या वेळी रात्री १२.३० च्या सुमारास माझ्या लक्षात आले की प्रत्येक भक्ताने गुरूंना काही ना काही दिले आहे. सतत सेवेमध्ये असल्यामुळे एवढा वेळ ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नव्हती. जेव्हा सर्वात शेवटी नमस्कारासाठी मी रांगेत उभा राहिलो तेव्हा माझ्या मनात अपराधी भावना होती की मीच गुरूंसाठी काही आणलेले नाही. आणि एवढया रात्री मी काय आणणार ? मनात सद्गुरुंना प्रार्थना केली की, "सद्गुरु भाऊ, आजच्या या शिष्याच्या जीवनातील एका महत्वाच्या दिवशी मी तुम्हाला देण्यासाठी काही वस्तुस्वरुपात आणलेले नाही. तरी याक्षणी मी माझे संपूर्ण जीवन आपल्या चरणी अर्पण करीत आहे." असे म्हणून मी नमस्कार केला.
डोळ्यामध्ये अश्रू असतानाच सद्गुरु भाऊमहाराजांच्या चेहऱ्याकडे माझी नजर गेली. - तर चेहरा व डोळ्यांमध्ये अतिशय प्रसन्न भाव आणि उजवा हात आशीर्वादासाठी वर केलेला असे माझ्या सद्गुरुंचे रुप मी पाहिले. त्या हास्यात माझी प्रेमपूर्वक अर्पण केलेली गुरुदक्षिणा स्वीकारल्याचा भाव मी अनुभवला आणि त्यानंतर एका लगेचच्या प्रवचनामध्ये खऱ्या शिष्याने गुरूंना काय अर्पण करावे हे सांगताना सद्गुरु भाऊ म्हणाले, "सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा हीच असते की त्या शिष्याने स्वतःचे सर्वस्व, जीवनच गुरूंना अर्पण करावे" माझे जीवन माझे नसून ते सद्गुरुंच्याच हातात आहे आणि माझे सद्गुरुच ते घडवत आहेत याची प्रचिती मला पुढे कायम मिळत गेली.
दत्तजयंती - १ डिसेंबर १९९० या दिवशी खोपोली येथे प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न व्हायचा होता. संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांचा शुभमुहूर्त निश्चित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने बोरिवली येथील स्थानावरून स्वामी महाराजांच्या पादुकांची पालखी व पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेतील भक्तांमध्ये मी सुद्धा होतो.
"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" या नामाचा गाजर करीत ४ दिवसांमध्ये सर्व भक्त खोपोली येथे पोचले. काही ना काही दिव्य प्रचिती नक्की मिळणार याची मनामध्ये खात्री होती. पण ४ दिवस अखंड चालूनसुद्धा सद्गुरुंचा कुठलाही अनुभव आला नाही. त्यामुळे माझे मन खुपच बेचैन झाले. कसे बसे मनाचे समाधान करून घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी असे कळले की पदयात्रेतील फक्त दोघा तिघांनाच गुरुवर्य भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अनुभव आला होता. परंतु त्या अनुभवाचे आकलन त्यांना भाऊमहाराजांनी घडलेल्या प्रसंगाची जाणीव करून दिल्यानंतरच झाले. मनाला चुटपुट लागली की, "मला अशी प्रचिती का मिळाली नाही? कदाचित माझी भक्तीतील कळकळ तळमळ कमी पडली असावी."
त्यानंतर बरोब्बर ५ वर्षांनी म्हणजेच १९९५ सालच्या दत्तजयंतीला पुन्हा बोरिवली ते खोपोली अशी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी निमित्त होते "नमो गुरवे वासुदेवाय" या लिखित नामजपाच्या संकल्पपूर्ततेचे. यावेळी पदयात्रा निघण्यापूर्वीच मनाशी निश्चय करून गुरुवर्य भाऊंची भेट घेतली आणि त्यांना प्रार्थना केली की, "मागच्या वेळेच्या पालखीला तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही भक्तांना जी प्रचिती मिळाली ती त्यांना त्याचवेळी कळली नाही. तरी ह्या वेळेला आम्हाला प्रचिती मिळायलाच पाहिजे, तिची साक्ष लगेच पटली पाहिजे व तिचा आनंद सर्वांना मिळाला पाहिजे. " त्यावर भाऊंनी अतिशय प्रेमाने मला आशीर्वाद दिला व म्हणाले, "हो तर. नक्की प्रचिती मिळणार."
पालखीला अतिशय प्रसन्न वातावरणात सुरुवात झाली. या वेळेला मी पहिल्यापासूनच दक्ष होतो की कुठे काही अनुभव व प्रचिती मिळते का. पहिला दिवस असाच गेला. दुसराही दिवस प्रचितीशिवाय गेला. पदयात्रा पानवेलपर्यंत पोचली होती. मन सतत गुरुंचा धावा करत होते. मी कोणाला काही बोलत नव्हतो पण सद्गुरुंशी सतत अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करत होतो. तिसऱ्या दिवशी सकाळी पालखी पनवेलहून निघाली. मन बेचैन होतेच. सकाळचे साधारण साडेदहा वाजले असतील.
नामजपाच्या डायऱ्या एका ट्रकमध्ये सजवून नेत होतो. मध्येच त्या पडायला आल्या म्हणून आम्ही त्या नीट करण्यासाठी थांबलो. इतक्यात माझी नजर डाव्या बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे गेली. काही क्षण नजरानजर झाली व मी स्तब्ध झालो. इतक्यात कोणीतरी मला हलवले आणि मी थोडासा भानावर आलो तेव्हा पालखीतील भक्त श्री. योगेश ठाकूर व श्री. आशिष येरंडेकर हे त्या व्यक्तीशी बोलत होते.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|