|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

ऋणनिर्देश

  • सर्व सत्पुरुष - ज्यांनी आम्हाला निमित्त करून या पुस्तकाच्या निर्मितीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
  • श्री व सौ. वैद्य ज्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास होता की ते हे पुस्तक वेळेत छापून आपल्यासमोर आणतील. एवढ्या कमी कालावधीत हे काम करणे अतिशय अवघड गोष्ट होती. मी त्यांना टाईप करून झालेले मॅटर द्यायचे व त्यांनी रिटाईप करून लगेचच ते प्रिंटिंगसाठी तयार करायचे.
  • मुखपृष्ठ करणाऱ्या स्वाती बोपर्डीकर व विलास नार्वेकर या फोटोग्राफीक्स ग्रुपच्या दोन्ही कलाकारांचे तसेच श्री. अशोक बागवे यांचे, ज्यांच्यामुळे या पुस्तकाचे प्रिंटिंग अल्पावधीत पार पडले. त्याच बरोबर मे.सुंदरम प्रिंटिंग प्रेस, वडाळा मुंबई यांचेही आभार.
  • माझी आई श्रीमती उषा राजाराम धोंड जिने या सर्व काळामध्ये मला माझ्या मुलांचे संगोपन करण्यास बहुमोल मदत केली ज्यामुळे सतत या विचारांमध्ये रहाणे मला शक्य झाले.
  • आणि अर्थातच...सदगुरु भाऊमहाराजांचे सर्व भक्त ज्यांनी आपले अनुभव इथपर्यंत पोचवले.

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>