|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

पिंगळीचा कृष्ण सखा परमपूज्य श्री विनायक अण्णा राऊळ महाराज

श्री .राणेंकडून निघाल्यानंतर श्री. साखळकर काकांच्या सांगण्यावरून, कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे राऊळ महाराजांकडे जायचे ठरले होते .आमच्यापैकी दोघे तीघे जण सोडले तर कोणालाच या ठिकाणाची माहिती नव्हती. गाडीमध्ये मी श्री .विकास यांना या स्थानाविषयी आणि श्रीराऊळमहाराजांविषयी माहिती विचारली तेव्हा त्यांनाही ते राऊळ महाराज हे एक फार मोठे अवलिया सतपुरुष होते, याविषयी याशिवाय फारशी माहिती नव्हती. श्री .साखळकर काका एवढेच सांगू शकले की ते राऊळमहाराजांच्या नंतर कोणी 'अण्णा 'नामक व्यक्ती त्यांच्या ठिकाणी आहे.

दोघे तीघे जण सोडले तर कोणालाच या ठिकाणाची माहिती नव्हती. गाडीमध्ये मी श्री .विकास यांना या स्थानाविषयी आणि श्रीराऊळमहाराजांविषयी माहिती विचारली तेव्हा त्यांनाही ते राऊळ महाराज हे एक फार मोठे अवलिया सतपुरुष होते, याविषयी याशिवाय फारशी माहिती नव्हती. श्री .साखळकर काका एवढेच सांगू शकले की ते राऊळमहाराजांच्या नंतर कोणी 'अण्णा 'नामक व्यक्ती त्यांच्या ठिकाणी आहे. निघायचे असा आमचा विचार होता. तेथील एका सेवेकर्‍याने "अण्णा तुम्हाला इथे वरती भेटतील" असे सांगितले. त्याप्रमाणे श्री. विकास, मी, श्री .प्रदीप व श्री. साखळकर असे चौघेजण वर गेलो. तेथे एक व्यक्ति पाठमोरी बसली होती आम्ही लांबूनच त्यांना "अण्णा "अशी हाक मारून येण्याविषयी विचारले. त्याने खुणेनेच 'या'सांगताच ,एकंदरीत त्या व्यक्तीचे स्वरूप पाहून घाबरत घाबरत आत गेलो व त्यांच्या समोर जाऊन बसलो.

ते काहीतरी लिहीत बसले होते. लिहिता लिहिता मध्येच काही सेकंद समोर आमच्याकडे बघायचे व पुन्हा मान खाली घालून आपले काम करायचे. त्या बघण्यामध्ये तेव्हा थोडा निर्विकारपणा होता त्याचप्रमाणे जरबही होती. अशीच जवळ जवळ १० मिनिटे गेली. आम्हाला काही कळेना. बरं स्वतःहून काही विचारायची हिम्मत होत नव्हती. एवढ्याच जणुकाही त्यांची त्यांच्या मनातील काही समीकरणे जुळल्याप्रमाणे, त्यांनी आम्हाला त्यांच्या जवळ बोलावले व आमची चौकशी केली. मी त्यांना सद्गुरू भाऊमहाराजांविषयी आणि त्यांच्या ७५ व्या जयंतीवर्षप्रित्यर्थच्या संकल्पा विषयी सांगितले. ऐकताना ते थेट माझ्या डोळ्यात बघत होते. आणि पाहता पाहता .,....त्यांनी अतीव प्रेमपूर्वक आपले दोन्ही बाहू पसरून आम्हाला आपल्या मिठीत घेतले. त्याक्षणी आमच्या देहं मनाला झालेल्या अतिशय सुपरिचित अशा परिसस्पर्शाने य आम्ही एकच शब्द उच्चारू शकलो- "भाऊ"

एक दोन मिनिटांकरिता आम्ही त्याच अवस्थेमध्ये होतो. डोळ्यांमधून अश्रू ओघळत होते. आम्हाला स्वतःचे देहभान राहिले नव्हते. एकाच वेळी आमचे सद्गुरु भाऊ, श्रीअक्कलकोट स्वामी आणि श्रीगजानन महाराज यांचा त्रिवेणी संगम आम्ही त्याक्षणी आमच्या तना-मनाने अनुभवत होतो. श्री. विकास म्हणत होते "श्रद्धा हेच सर्वस्व आहे. हेच आपले भाऊ, हेच स्वामी समर्थ, हाच साक्षात विठोबा." आमचे अश्रू थांबत नव्हते. थोड्यावेळाने आम्ही थोडेफार भानावर आलो, तेव्हा साक्षात अवलिया स्वरूपातील श्री. अण्णा उच्चारले "कोणीही कुठे गेलं नाही आणि कोणी कुठे आलं नाही. सर्व इथेच आहे". त्यानंतर गेल्या अनेक वर्षांमध्ये सद्गुरु भाऊ महाराज आमच्याशी जे काही बोलत होते; तेच तंतोतंत श्रीअण्णा आमच्याशी बोलले. ते पुढे म्हणाले "आपले अनेक जन्मांचे ऋणानुबंध आहेत आणि यापुढेही ते असणार आहेत."

<< Previous      Next >>