|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

या संत सत्युख्षांचेही एकमेकांशी क्रणानुवंध असतात. श्रीचैतन्यगगनगिरी महाराजांचा व सद्गुरू भाऊमहाराजांचा एकमेकांविषयीचा स्नेह आम्ही भक्तांनी अनेकदा अनुभवला आहे . सदगुरू भाऊमहाराजांनी देहं ठेवण्यापूर्वी काही महिने आम्हा दोघांना सांगितले होते की - “मी असेन किंवा नसेन, पण तुम्ही नियमितपणे खोपोली येथे परमपूज्य गगनगिरी महाराजांकडे जात रहा . ” श्रीगगनगिरी महाराजांनीही श्रीगगनगिरी महाराजांचे परमशिष्य श्रीआशीशजी महाराज यांच्या माध्यमातून सदगुरू आनंदयोगेशवरांच्या कार्यामध्ये आम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून मानसिक आधार दिला आहे .

द्वारकामाईतील सद्गुरूकार्याची शपथ व
श्रीक्षेत्र शिर्डीतील नामस्मरण

आता आम्ही बरेच निश्‍चिंत झालो होतो. कारण ७५ नामस्मरणांपिकी बराच मोठा पल्ला गाठला गेला होता व सद्गुरू आनंदयोगेश्‍वर निळकंठ महाराजांचे ७५ वे नामस्मरण नजरेच्या टप्प्यामध्ये आले होते . त्याचवेळी आमच्या दोघांच्या मनामध्ये एक संकल्पना आकार घेत होती . ९ जुलै, २००० या दिवशी जेव्हा सद्गुरू भाऊमहाराजांच्या उपस्थितीत व आशीर्वादाने 'आनंदयोग धाम' या सद्गुरुंच्या पादुका -स्थानाची स्थापना आमच्याकडून घडली होती; त्या सुमारास आम्ही श्रीसाईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी श्रीक्षेत्र शिर्डी येथे गेलो होतो . त्यावेळी आम्ही द्वारकामाईमध्ये एकमेकांच्या हातावर हात ठेवून शपथ घेतली होती की - "जोपर्यत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत सद्गुरूंचे हे कार्य आम्ही सोडणार नाही. ती शपथ आम्ही प्राणपणाने आजतागायत पाळली आहे

त्याचप्रमाणे सदगुरू आनंदयोगेश्वरांवरील अनेक आरत्या व कवने जी माझ्याकडून लिहून घेतली गेली, त्यामागेही श्रीसाईबाबांचीच प्रेरणा होती . त्यामुळे सदगुरू आनंदयोगेशवर निळकंठ महाराजांच्या ७५व्या जयंतीवर्षांप्रित्यर्थ केलेल्या या ७५ नामस्मरण' संकल्पातील शेवटचे व अतिशय महत्वाचे नामस्मरण श्रीक्षेत्र शिर्डी येथे करावे असे आम्हा दोघांना वाटू लागले. जेव्हा एखादा विचार अंतर्मनाच्या गाभ्यातून येतो; तेव्हा तो परम अशा आत्माचा आवाज असतो असे म्हणतात. आम्हीही ही बहुतेक बाबांचीच इच्छा असावी या पूर्ण श्रध्देने, वरील आशयाचे पत्र लिहून, श्रीशिर्डी संस्थानचा फॅक्स नंबर शोधून तेथे फॅक्स केले व पत्राची दुसरी कॉपी कुरियरने पाठवली . त्यात आम्ही सदगुरू आनंदयोगेश्‍वरांनी केलेल्या कार्याची माहिती व 'आनंदयोग धाम' वरून सुरू असलेल्या त्यांच्या कार्याची माहिती लिहून “७५ नामस्मरण' संकल्पातील शेवटचे ७५वे नामस्मरण शिर्डीत करण्याच्या आमच्या सदिच्छेविषयी परवानगी मागितली .

खरं बघायला गेलं, तर आमच्याकडून केले गेलेले हे फार मोठे धाडसच होते. कारण सद्गुरू आनंदयोगेशवर ही विभूति जरी महान असली, तरी आम्ही मात्र अतिसामान्य असल्याने एका फॅक्सवर त्यांचा होकार अपेक्षित करणे हे धाडसाचेच होते . पण “सद्गुरू पाठीशी असल्यावर कसली चिंता करायची' या आत्मविश्वासावरंच आम्ही हे धाडस केले होते. तरीही, 'त्यांनी परवानगी दिलीच तर ते नामस्मरण कुठे करायला सांगतील, आपल्याला मुख्य मंदिरात किंवा द्वारकामाईमध्ये नामस्मरण करायला मिळाले तर किती वरे होईल' - असे अनेक विचार दोन दिवस आमच्या मनात घोळत होते . आणि खरोखरंच आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन दिवसांनी शिर्डी येथे फोन केला असता त्यांनी श्रीसाईबाबांच्या मुख्य समाधीमंदिरासमोर असलेल्या स्टेजवर आम्हाला नामस्मरण करण्यास परवानगी दिल्याचे व तसे पत्र आमच्या पत्त्यावर पाठवले असल्याचे सांगितले.

आमचा आनंद गगनात मावेना. काय ही सद्गुरूंची कृपा! आम्ही जोरात नाशिक शिर्डी यात्रेची तयारी सुरू केली - यात्रेमध्ये येणा-या सर्व भक्तांच्या अंगात उत्साह संचारला . आम्ही मनात संकल्प केलेल्या सदगुरू आनंदयोगेश्‍वरांच्या परमपावन अस्थीविसर्जनाच्या तीर्थक्षेत्रापेकी श्रीक्षेत्र त्रंबकेश्‍वरमध्येही नामस्मरण करण्याचा विचार होता . तेथे फोन करून परवानगी मागितली असता त्यांनी कुरियरने आमच्या स्थानाची व नामस्मरणाची माहिती पाठवून रीतसर पत्र लिहिण्यास सांगितले व अंती परवानगी दिली . मी या यात्रेविषयी परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराजांनीही फोनवरून सांगून त्यांचे आशीर्वाद घेतले; कारण या कार्यामध्ये सदगुरू समर्थ विनायक अण्णा राऊळमहाराज हे आमचे देहंरूपातील गुरू आहेत. श्रीअण्णा यांना जेव्हा मी शेवटचे ७५वे नामस्मरण शिर्डीत करण्याविषयी सांगितले तेव्हा ते पट्कन म्हणाले “आपण करू या"

<< Previous      Next >>